गावाविषयी माहिती
वडझिरे हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात उत्तरेकडून १० किलोमीटर च्या अंतरावर एक छोटेसे प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्याजनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २४३५आहे.गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे ३ व व्यायामशाळा१, लोकनेते वसंतरावनाईकवडझिरे सार्वजनिक वाचनालय अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच सर्व देवी देवतांचे मंदिरे, सामुदायिकसभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी अशा धार्मिक व सामाजिकसुविधा देखील आहेत.गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून कोबी, फुलकोबी, , सोयाबीन, कांदा, शिमला मिर्ची व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. या पिकांच्यालागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. नाशिक जिल्यात भाजीपाला उत्पन्न मध्ये वडझिरे गावाचा मोठा वाटा आहे.
वडझिरे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्याआहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थींना घरकुल लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारतअभियान अंतर्गत वडझिरे गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवलाआहे. जल जीवन मिशन व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यातआला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
वडझिरे गाव आज सिन्नर तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
वडझिरे हे गाव सिन्नर तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १० कि.मी. अंतरावर व नाशिक शहरापासून २३ किमी अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ १२८५.६० आर चौ.कि.मी.असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण १६४ कुटुंबेयेथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २४३५आहे. त्यामध्ये १२६६ पुरुष व ११६९ महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने असमतल डोंगराळ प्रदेश असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. गावालगत आहे ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे.उन्हाळ्यात तापमान साधारणतः३७°से.पर्यंत जाते, तर हिवाळ्यात ७°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६१ ते ७१ से.मी. पर्जन्यवृष्टी होते. वडझिरे गाव कोबी, फुलकोबी व भाजीपाला उत्पादनासाठी संपूर्ण नाशिक जिल्यात प्रसिद्ध आहे.
लोकजीवन
वडझिरे गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेतीहा येथील मुख्य व्यवसाय असूनकोबी, फुलकोबी, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपालापिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे. सदरीलगावामध्येडीजेलावण्याससक्तमनाईआहे.
येथील लोक मेहनती, मदतशील वअतिथी देवो भवया विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
वडझिरे गावाच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकहीदिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
लोकसंख्या
पुरुष
स्त्रिया
एकूण
संस्कृती व परंपरा
वडझिरे गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व अखंड हरीनाम साप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावातउत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्धसर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिकउपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिलासामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.
यामुळे वडझिरे गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
प्रेक्षणीय स्थळे
- ग्रामदैवताचे मंदिर – काशाई देवी हे गावातील प्रमुख देवतेचे मंदिर आहे हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी यात्रा, धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
- हनुमान मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.
- महादेव मंदिर – वडझिरे गावामध्ये महादेवाचे पुरातन मंदिर असून ग्रामस्थांचे श्रद्धा स्थान आहे.
जवळची गावे
वडझिरे गाव मोह, माळेगाव, ब्राम्हणवाडे, नायगाव, जायगाव हेआहे. असून आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे वडझिरे गावाशी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिकव सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.
मोह, माळेगाव, ब्रम्हावाडे, नायगाव, जायगावआसपासची प्रमुख गावे आहेत.
गटविकास अधिकारी

गटविकास अधिकारी
ग्रामपंचायत प्रशासन

सौ. सुनिता महादू आंबेकर
सरपंच
(+91 ) ७०३८३ ५२९९०

श्री. मनोहर नाना बोडके
उपसरपंच
(+91 ) ८७८८४ ३०१६८

श्री. बाळू महादु बोडके
सदस्य
(+91 ) ९४२२७ ५३४९८

सौ. प्रमिला बाळासाहेब बोडके
सदस्य
(+91 ) ८४११८ १५७८७

सौ. मनिषा रामेश्वर बोडके
सदस्य
(+91 ) ९९७०८ ५५७९८

श्री. भिमराव तात्याबा दराडे
सदस्य
(+91 ) ८७८८१ ०३५१७

सौ. अरुणा पांडुरंग बोडके
सदस्य
(+91 ) ९४२३१ ७७००७

सौ. मंगल शिवाजी बोडके
सदस्य
(+91 ) ९०९६२ १६०९२

श्री. भास्कर रंगनाथ ठोंबरे
सदस्य
(+91 ) ७७५७८ ५६१७१
समन्वय कर्मचारी
अ.नं. | नाव | विभाग पद | संपर्क क्रमांक |
---|---|---|---|
1. | श्रीमती. राखी विलास बोंद्रे | ग्रामपंचायत अधिकारी | (+91) ९५०३३ ५५२६८ |
2. | श्रीमती. सुवर्णा आनंदराव गांगुर्डे | ग्राम महसूल अधिकारी | (+91) ८८८८८ ९८८८० |
3. | श्री. भाऊशेठ विठ्ठल आंबेकर | पोलीस पाटील | |
4. | सहाय्यक कृषी अधिकारी | ||
5. | कोतवाल | ||
6. | श्री. संदीप गुलाब आंबेकर | ग्रामपंचायत कर्मचारी | (+91) ९६६५६ ७१८४३ |
7. | श्री. अमोल नागरे | ग्रामपंचायत कर्मचारी | (+91) ९०४९९ ३७५२६ |
ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले
जन्म नोंद दाखला
मृत्यु नोंद दाखला
विवाह नोंदणी दाखला
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला
निराधार असल्याचा दाखला
नमुना ८ चा उतारा
शिक्षण विभाग
अंगणवाडी विभाग
विद्यार्थी संख्या
अंगणवाडी नाव | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
अंगणवाडी वडझिरे | 15 | 15 | 30 |
अंगणवाडी धाबेवाडी | 8 | 8 | 16 |
अंगणवाडी नगारा वस्ती | 09 | 06 | 15 |
एकूण | 32 | 29 | 61 |
अंगणवाडी सेविका माहिती
नाव | पद नाम |
---|---|
शांताबाई बाळासाहेब सांगळे | अंगणवाडी सेविका |
सुनिता शंकर नागरे | अंगणवाडी सेविका |
शोभा शरद बोडके | अंगणवाडी सेविका |
पूनम वैभव कडवे | अंगणवाडी मदतनीस |
सिंधुबाई विठ्ठल बोडके | अंगणवाडी मदतनीस |
पूजा अरुण नागरे | अंगणवाडी मदतनीस |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडझिरे
विद्यार्थी संख्या
इयत्ता | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
पहिली | 14 | 22 | 36 |
दुसरी | 14 | 12 | 27 |
तिसरी | 17 | 12 | 29 |
चौथी | 21 | 20 | 41 |
पाचवी | 19 | 19 | 38 |
सहावी | 16 | 18 | 34 |
सातवी | 17 | 12 | 29 |
एकूण | 118 | 116 | 234 |
शिक्षक माहिती
नाव |
---|
श्री. गंगाधर सीताराम शेवाळे |
श्री. विवेक वसंत घोलप |
श्री. संजय देवराम शिरसाट |
श्री. जीवन वामन पवार |
श्रीमती. भारती सुधाकर चव्हाण |
वैशाली चंद्रवजन पंडित |
प्रतिभा दिनकर देशमुख |
आरोग्य विभाग
अ.नं. | नाव | आरोग्य विभाग पद | संपर्क क्रमांक |
---|---|---|---|
1. | डॉ.मोहन बच्छाव | तालुका वैद्यकीय अधिकारी | (+91) ७८७५४ ११७११ |
2. | डॉ.मनीषा वाघ | पी.एच.सी. वैद्यकीय अधिकारी | (+91) ८३२९५ १७४९७ |
3. | डॉ. दुशंत पी सांगळे | उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी | (+91) ९५१८९ ३१००३ |
4. | जी.बी.सानप | आरोग्य सेवक | (+91) ९६५७१ ०१५९३ |
5. | एस. एस. देवरे | आरोग्य सेविका | (+91) ७७७६८ ७११०३ |
6. | सौ. सरला गोरक्षनाथ बोडके | आरोग्य सेविका | (+91) ८३२९२ ०४६३९ |
7. | सौ. शोभा दत्तात्रय सांगळे | आशा वर्कर | (+91) ८८५६९ ९२५३५ |